कराड :– कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूल, विजयनगर येथे आषाढी एकादशीनिमित्त टाळ, लेझीम, ढोल ताशांच्या गजरात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.
डोळयाचे पारणे फेडणारा दिंडी सोहळा. टाळ, लेझीम पथक ढोल ताशांच्या गजरात, विठू माऊलीच्या जयघोषात कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूल, विजयनगर येथे दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपारिक पोषाख परिधान करून आनंदाने दिंडी सोहळयात भाग घेतला. लेझमाच्या व ढोल ताशांच्या तालावर नाचत विद्यार्थिनींनी लयबद्ध प्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली या दिंडी सोहळयात ज्यूनिअर केजी, सिनीयर केजीच्या मुलांनीही पारंपारिक वेशभुषा करत दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण बनले होते कल्याणी स्कूल पासून दिंडीला सुरूवात झाली व केदारनाथ मंदिरात दिंडीची सांगता झाली.शाळेतील शिक्षकांकडून फेर धरून दिंडी सोहळयाचा आनंद लूटला.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रावते मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

Author: Janmat News





