कराड :- चोरी केलेली दुचाकी विकताना एकास अटक. कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने सापळा लावून अटक केली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सुनिल श्रीपती गावडे (वय 35) रा. येलुर ता. वाळवा जि. सांगली असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नारायणवाडी ता. कराड येथे एक इसम चोरीची दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो. हेड. कॉ. नितीन येळवे, पो.ना. सज्जन जगताप, सचिन निकम व पो. हेड. कॉ. उत्तम कोळी यांनी नारायणवाडी, पाचवड फाटा येथे सापळा लावला असता एक इसम गाडीवरुन आला त्यांचा संशय आल्याने ताब्यात घेतले.
Author: Janmat News





