Janmat News

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू ; क्षणात सर्व काही संपल.

जळगाव, 14  :–   भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आजपासून सीबीएससी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सुयोग भूषण बडगुजर वय 13 वर्ष असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो भोवळ येऊन खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुयोगच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.                                                          शाळेचा पहिला दिवस.                                          घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सुयोग हा शहरातील डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. आज शाळेचा पहिला दिवस होता. तो शाळेत गेला. मात्र त्यानतंर काही वेळातच त्याला भोवळ आली आणि तो जमिनीवर कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. सुयोगच्या निधनानं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.             सुयोग हा गेल्या दोन वर्षांपासून हायपर टेन्शन व उच्च रक्तदाबाने त्रस्त होता. त्याला पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जाणार होते. त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. अत्यंत हुशार अशा सुयोगच्या निधनाने शाळेसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Janmat News
Author: Janmat News