कराड ( प्रतिनिधी ) :- विद्येचे माहेरघर म्हणून परिचित असणाऱ्या सैदापूर विद्यानगर भागात असंख्य चालणाऱ्या कॅफेवर आज अचानक पणे कराड पोलिसांनी छापे मारले या छाप्या अनेक युवक युवतींना ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले येथे चालणाऱ्या कॅफेच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या मधून बोलल्या जात होत्या कॅफेवर अचानकपणे पोलिसांनी मारलेल्या छाप्यामुळे कॅफे चालवणाऱ्या व्यवसायिकाच्या मोठी खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यात चालणाऱ्या कॅफे विषयी जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या एक महिन्यापूर्वी नोटीस देखील काढल्या होत्या त्या नोटीसद्वारे कॅफे कसे चालवावे याविषयी निकष नियम देण्यात आले होते.
Author: Janmat News





