उद्योजक बनवतो असे अमिष दाखवुन ३५,००,००० /- रुपयेची फसवणुक करणाऱ्या आरोपीस उंब्रज पोलीसांकडुन नवी मुंबई येथून अटक, दोन दिवसांची पोलीस कस्टडी
उब्रंज :- दिनांक २८/०७/२०२० रोजी ते दिनांक ०६/०१/२०२२ रोजी तक्रारदार श्री. रोहित राजकुमार कदम रा. पेरले ता. कराड यांना MIDS ( Institue of maha E Learning Dignnity Skil Develoment Ltd Mahaudajk Group ) या कंपनीमध्ये प्रोजेक्ट घेणेसाठी तक्रारदार यांचा मित्र अरुण रावसाहेब माने रा. बनवडी ता. कराड यांचे सांगणे वरुन फिर्यादी यांनी सदर कपंनीशी बेबी डायपर प्रोजेक्ट अॅग्रीमेंट प्रमाणे अमोल गोविंद शिंदे रा. वडूज ता. खटाव जि. सातारा, अरुण रावसाहेब माने रा. बनवडी ता. कराड, हर्षद गुलाब इनामदार रा. अहीरे कॉलनी कोडोली सातारा ता. सातारा हे फिर्यादीचे वरचेवर घरी जावून फिर्यादी यांना तु बेबी डायपर प्रोजेक्ट मॅन्युफॅक्सरिंग या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेसमेंन्ट कर तुला फायदा आहे. तु एक मोठा उद्योजक बनशिल व आमच्या कंपनीमध्ये डायरक्टर बाँडी मध्ये तुला घेतो असे अमिष दाखून फिर्यादी यांची ३५,००,०००/- रुपयेची फसवणुक केली बाबत उंब्रज पोलीस स्टेशन गु. र. नं. ८४ / २०२३ भादंवि कलम ४२०, ४०६, ४०८, ३४ प्रमाणे दाखल करणेत आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी अमोल गोविंद शिंदे रा. वडूज ता. खटाव जि. सातारा हा गुन्हा घडले पासून फरार होवून आपले ठिकाण बदलून आपली अटक वाचविण्याचा प्रयत्न करीता होता. सहा. पोलीस निरीक्षक श्री. गोरड यांनी गोपनीय माहिती व टेकनिशन यांचे मदतीने सदर आरोपीस नवी मुंबई येथून ताब्यात घेतले. सदर आरोपी अमोल गोविंद शिंदे रा. वडूज ता. खटाव जि. सातारा यास आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री महेश पाटी पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. समीर शेख सो, पोलीस अधीक्षक सो सातारा, मा. श्री. बापू बांगर साो अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. अमोल ठाकुर साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांचे मार्गदर्शनाखाली उंब्रज पो. स्टे. चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड, पो. उपनिरीक्षक महेश पाटील, पो. हवा शशिकांत काळे, पो. कॉ. श्रीधर श्रीमंत माने यांनी केलेली आहे.
Author: Janmat News





