Janmat News

आता देशाचं कर्ज फेडायचं आहे -नरेंद्र मोदी – News18 लोकमत

04 एप्रिल गुजरात : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जी दोन नावं सर्वात जास्त चर्चेत आहेत ती म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. मोदी यांनी आज पहिल्यांदाच जाहीरपणे पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेबद्दल स्पष्ट संकेत दिले आहे. आपल्या सर्वांवर भारतमातेचं कर्ज आहे आणि आपण ते फेडलं पाहिजे असं त्यांनी गांधीनगरमधल्या एका कार्यक्रमात म्हटलं. विशेष म्हणजे आजच राहुल गांधी यांनी सीआयआय (CII) या उद्योजकांच्या परिषदेत पंतप्रधानपदाबद्दल प्रश्न विचारणं गैरलागू असल्याचं म्हटलं आहे. या परिषदेत बोलताना त्यांनी थेट कुणावरही टीका केली नाही. पण, कुणी एक व्यक्ती संपूर्ण विकास साधू शकत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला. त्यामुळे राहुल हे पंतप्रधानपदाबद्दल अनुत्सुक असल्याचे संकेत मिळताहेत तर मोदी यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्याचं स्पष्ट होतंय. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. Source link

Janmat News
Author: Janmat News