नागपूर, 23 जून : उपराजधानी नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय (Central Museum Nagpur) हे राज्यातील सर्वात जुन्या संग्रहालयात पैकी एक आहे. हे संग्रहालय सध्या नागपुरात ‘अजब बंगला’ (Ajab Bangla) या नावाने सगळ्यांना सुपरिचित आहे. त्याचबरोबर गाईड विरहित संग्रहालय म्हणून देखील या संग्रहालयाची ओळख देशात होत आहे, संग्रहालयाने एका अँड्रॉइड ॲपची निर्मिती केलेली आहे. यामध्ये संबंधित संग्रहित वस्तूचा बारकोड स्कॅन केल्यानंतर त्यावरुन संग्रहित वस्तूची माहिती मिळविता येते. संग्रहालय आणि त्याच्या ॲपबद्दलचा हा विशेष रिपोर्ट पाहूया.
विज्ञानाने दिवसेंदिवस प्रगती केली आहे. अगदी प्राचीन काळापासून ते अत्याधुनिक काळापर्यंत मानवाच्या उत्क्रांतीसह विज्ञानाची देखील उत्क्रांती झाल्याची आपण पाहत आहोत. मात्र, प्राचीन काळाची अचूक माहिती मिळवणे त्याचा इतिहास समोर आणणे, इतिहासाची माहिती साठविणे, जतन करणे हे काम संग्रहालय करीत असतात. संग्रहालय म्हणजे भूतकाळातील आरसा होय. नागपुरातील हेच संग्रहालय डिजीटल झाले आहे. संग्रहालयातील वस्तूची माहिती ॲपद्वारे मिळून हे ॲप संग्रहायातील माहिती सागंणारे एकप्रकारे गाईड असणार आहे. संबंधित संग्रहित वस्तूचा बारकोड स्कॅन केल्यानंतर त्यावरून त्या संबंधित संग्रहित वस्तूची माहिती मोबाईडलवर मिळविता येते.
वाचा : मुलांनो, करिअर इथंही चांगलंय! मुंबई विद्यापीठाकडून ‘पाली’चे 7 कोर्सेस सुरू; कसा कराल अर्ज? VIDEO
तुमच्या शहरातून (नागपूर)

Nagpur News: माहेर सोडण्याआधीच सपनाच्या घरावर हातोडा, अखेर आंदोलनातच उरकला साखरपुडा, Video

Monsoon Update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत मोठी अपडेट

Gold Price in Nagpur : पुणे, नाशिकनंतर नागपूरमध्ये घसरलं सोनं, पाहा काय आहे आजची किंमत?

Nagpur News: तुमची कार काळा धूर सोडतेय का? वेळीच घ्या काळजी नाहीतर होईल मोठं नुकसान, VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या नावाबाबत अनिल देशमुख स्पष्टच बोलले

Gold Price in Nagpur : उपराजधानीत सराफ बाजारात चाललंय काय? पाहा आजचे सोन्याचे दर

Chandra grahan 2023: भारतात दिसणार छायाकल्प चंद्रग्रहण, उद्या नेमकं अंतराळात काय घडणार? Video

Gold Price in Nagpur : उपराजधानीत सोनं पुन्हा महागलं, पाहा आज किती वाढली किंमत

रेल्वे ट्रॅकवर विचित्र अपघात, मालगाडी थेट रिव्हर्स आली, कार-बुलेटला चिरडलं, PHOTOS

Nagpur News: नागपूरच्या रामन विज्ञान केंद्रात नवं दालन, 10 गोष्टी ज्या तुम्ही पाहिल्या नाही! PHOTOS

Gold Price in Nagpur : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, नागपुरात काय आहे दर
‘अजब बंगला’ या नावाने सगळ्यांना सुपरिचित
सन 1863 रोजी इंग्रज काळात मध्यवर्ती संग्रहालयाची स्थापन करण्यात आली होती. सध्या नागपुरात ‘अजब बंगला’ या नावाने सगळ्यांना हे संग्रहालय सुपरिचित आहे .आता ह्याच संग्रहालयाची ओळख देशात होत आहे, ती म्हणजे गाईड विरहित संग्रहालय म्हणून. यासाठी मध्यवर्ती संग्रहालयाने एका अँड्रॉइड ॲपची निर्मिती केलेली आहे. यामध्ये संबंधित संग्रहित वस्तूचा बारकोड स्कॅन केल्यानंतर त्यावरून त्या संबंधित संग्रहित वस्तूची माहिती मिळविता येते व सहजपणे त्याचा इतिहास जाणता येतो, अशी माहिती मध्यवर्ती संग्रहालयाच्या सहाय्यक संचालक जया वाहने यांनी दिली.
मध्यवर्ती संग्रहालयाची वैशिष्ट्ये
नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय महाराष्ट्रतील जुन्या संग्रहालयापैकी एक संग्रहालयात आहे. यात एकूण 10 दालने असून त्यात विविध संग्रहित वस्तूचा समावेश आहे. या मध्यवर्ती संग्रहालयाची बांधणी ही 1863 मध्ये इंग्रज सरकारने केली आहे. इंग्रजांच्या शासन काळात स्थापन झालेले हे संग्रहालय भारतातील नामवंत संग्रहालयापैकी एक आहे. सध्या हे संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. या संग्रहालयात विविध प्रकारचे प्रदर्शन दालने असून त्यातून पुरातत्व, सांस्कृतिक इतिहास, निसर्ग इतिहास, कला इत्यादी प्रकारातील वस्तू प्रेक्षक, पर्यटक आणि अभ्यासक यांच्यासाठी प्रदर्शित केल्या जातात.
वाचा : MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स
मध्यवर्ती संग्रहालयाची वेळ आणि पत्ता
नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत प्रेक्षक, पर्यटक आणि अभ्यासक यांच्यासाठी खूले असते. सोमवारी संग्रहालय बंद असते. मध्यवर्ती संग्रहालय, वर्धा रोड, आरबीआय स्क्वेअर जवळ, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र 440001 हा संग्रहाययाचा पत्ता आहे.
गुगल मॅपवरुन साभार
पाषाण शिल्पाचे प्रदर्शन
संग्रहालयातील पाषाणशिल्प दालन हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या दालनात प्राचीन व ऐतिहासिक काळापासून ते अठराव्या शतकापर्यंत नवनिर्मित पाषाण शिल्पाचे प्रदर्शन केले आहे. यामध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माशी निगडित पाशान शिल्पांचा समावेश आहे. या दालनात गांधार कलेचे व वाकाटक काळातील शिल्पे महत्त्वपूर्ण आहेत. सोबतच गोंड व भोसले काळाच्या मूर्ती प्रदर्शित केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.






